16251580_1270642549679398_547454193758800131_o

 .

‘ढलती हुई रात, अंधेरे का साथ, दोस्तोंसा हमसफर और मंज़िल की तलाश’

दिवस होता 29 डिसेंबरचा, वेळ होती रात्री एक ची आणि प्रवास होता पुणे नाशिक हायवेवरचा, लक्ष्य होते साधारणत: 350 किमी वर असलेल्या बागलाणच्या साल्हेर आणि offbeat किल्ल्यांचे आणि प्रयोजन होते न्यू इयर सिलेब्रेशनचे. Long night drive, गाडीत हिंदी मराठी गाण्यांची जुगलबंदी, बाहेर गुलाबी थंडी आणि आकाशातल्या ता-याची मंतरलेली रात्र व वा-याशी स्पर्धा करत सुसाट वेगात लक्षाच्या दिशेने झेपावलेली आमची गाडी. सोबत होती, ती माझ्यासारख्या मनमौजी आणि ध्येयवेडया Dipak Balwadkar​, Anuradha Gokhale​ , Subodh Atitkar​, Anand Pande​ या मित्रांची आणि कॅमेरा प्रेमींची. वाटले की या क्षणी ‘‘दिल ये चाहे इस आलम मे काश जमाना रुक जाय ’’ कारण आकर्षण जरी डेस्टीनेशचे असले तरी आनंद मात्र सफरीचाच असतो.

असाच प्रवास सुरु असतांना गप्पांचा फड रंगला, त्यातच ‘‘आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इस में ज़िंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है’’ या गीताचे शब्द कानी पडताच क्षणभर सर्व काही स्तब्ध झाल्यासारखे वाटले आणि मग जाणवलेकी संपूर्ण वर्ष कधी आले कधी संपले हे कळालेच नाही. गतवर्षांच्या अनुभवलेल्या आणि जगलेल्या क्षणांची चित्रफीतच नजरेसमोर तरळली व मन त्या विचारात गुंतून गेले.

आपण अनुभवलेले क्षण हे फक्त आपले एकटयाचे कधीच नसतात, आपल्या सभोवतालच्या परिसराच्या तसेच आपल्या सान्निध्यात आलेल्या व जीवनाचा भाग बनलेल्या व्यक्तींचेही असतात. भौतिक दृष्टया विचार केलातर एक वर्ष संपणे म्हणजे आपल्या आयुष्या तला ठराविक काळ कमी होणे. पण प्रत्येक वर्षी अनुभवलेले क्षण पहाता, मला असे वाटते की माझ्या आयुष्यातला एक वर्ष कमी न होता उलट माझे आयुष्य 10 पटीने अजून वाढले आहे. 2016 चा ताळेबंध पहाता या वर्षी मी कमवले तर नविन मित्र, नविन क्षितीज, पुन्हा पुन्हा जगावेसे वाटणारे क्षण, हिमालयाची उंची आणि सहयाद्रीची उबदार छाया….

याही वर्षी सालाबाद प्रमाणे हिमालयाची प्रदक्षिणा झाली. स्वतःच्या गाडीने हिमालयाची सफर, त्यातच Pravin Murkute​ ची ‘Tata Safari’ मग काय सोनेपे सुहागाच. नेहमी प्रमाणेच unplanned अशी ही ट्रिप, कोणताच आणि कुठलाच Plan ठरवलेला नसतांना, ‘जहां शाम, वही मुकाम’ या प्रमाणे राजमार्गांना सोडून वाटमार्गाने चाललेला हा प्रवास. वाटेल तिथे थांबावे, कधी 2 तर कधी 4 दिवस घालवावे. नकाशातल्या पारंपारिक वाटा सोडून Offbeat असलेल्या, अचानक सापडलेल्या वाटांवर गाडी घालून नवनविन शोधण्याच्या जिज्ञासेत प्रवासाची रंगत काही औरच.

रा़त्री उशीरा पुण्याहून प्रस्थान, नाश्ता ठाण्यातील अन्नाच्या टपरीवर, लंच बडौदयात गुजराथी थाळी आणि डिनर राजस्थानच्या सुनसान शुध्द देशी ढाब्यावर, पुढे हरयाणा पंजाबात पराठा लस्सी स्वस्त, शिमला मनालीतील North Indian चॅट फस्त, Reckong Peo गावात हिमाचली राईसप्लेटच मस्त. आपणास वाटेल की आम्ही फक्त खाण्यासाठीच ट्रेक ला बाहेर पडतो, पण तसे नसून पुर्वानुभवावरुन हिमालयात फक्त थुक्पा, मोमोज, चाउमिन आणि कधीतरी भात त्यामुळे आधीच जीभेचे लाड पुरवून नंतर अन्न हे पुर्ण ब्रम्ह समजून, मन मारुन समोर येईल ते खाणे या शिवाय पर्याय नसतो. तरी या वेळी आमचे सहयाद्रीचे मास्टर शेफ, Sir Johnson Tricclore​……ज्यांच्या बिर्यानीच्या प्रत्येक दाण्याची जीभेवर रेंगाळणारी चव ही अव्दितीय असते. यांनी हिमालयात देखील आम्हाला स्वादिष्ट भोजनाचा आनंद दिला. त्यांनी इथे ही , जमेल तिथे किचनचा ताबा घेत हॉटेल मालकापासून ते आमच्यापर्यंत सर्वांना तृप्त केले.

तासागणिक बदलणारे सौंदर्य, लोकजीवन, संस्कृती, खाद्य पदार्थ, यांचा अनुभव घेत घेत चाललेली ही हिमालयाची सफर…… सोबतच स्वत:ची गाडी असल्याने हॉटेल ते आमचं Sunset आणि Nightshoot ची ठिकाण कोसो दुर असतात. सायंकाळी हिमालयाच्या कुशीत कुठल्यातरी कोपऱ्यात बोचऱ्या थंडीत सुर्यास्ताची वाट पहाणं नेहमीचच. शांत आणि निर्वीकार आसमंत चोहिकडे, विराट हिमशिखरं आणि सायंकाळच्या संधी प्रकाशात न्हाउन निघालेली स्वर्ण मुकूटे निहाळायची. एकदा का संध्याकाळ झाली की Nightshoot साठी ता-यांची वाट पहात बसायचं आणि हळूच गाडीतून आणलेला Pocket Stove काढून सुप व पापड करायचे. तेथे फक्त आम्ही आणि आभळस्पर्शी पर्वत शिखरे, निरव शांतता, वा-यांची थंड झुळूक आणि हातात गरमागरम सुपाचा मग आणि त्यातच आकाशात रुजू होणारे ता-यांचे जथ्थे, असा लवाजमा आणि पाहूणचार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीसही न लाभणारा. एकदा का Tripod सेट करुन झाला की मग हळूच मॅगीचा बेत होतो. आकाशाकडे जमिनीवर पाठ टेकवून डोळे हरवून एकमेकांत काहीच संभाषण न करता ता-यांकडे मस्त पैकी एक टक बघायचे असे, कित्येक वेळा जसा चांदण्यांनी एक एक नमोदिप पाझळावा.

.

रात्रीचा तो गुढ आंधार ।

ता-यांचा तो भरजरी दरबार ।।

हिमालयाचा तो भारदस्त आकार ।

त्या दोन दिग्गजांच्या भेटीचा मी एकटाच साक्षीदार ।।

.

येथील उत्तुंग हिमशिखरांनी इतरांना न सांगितलेले अनेक सुर्यास्त पाहिलेली, अनेक वादळे झेललेली असतांना तरी ही नम्रपणे कोणताही गर्व न करता तटस्थ उभे असतात. का, तर मनुष्य प्राण्याच्या खोटया प्रशंसेकडे निसर्गरुपी देवाने लक्ष्य दयावे म्हणून.

काय वर्णावा महिमा हिमायलयीन लोक जीवनाचा, कुठेतरी दुरवर, डोंगर माथ्यावर, दऱ्याकपारीत, आदी वसाहत, ना लाईट, ना टिव्ही, नाही कोणतेही करमणूकीचे साधन, जीवनावश्यक गोष्टीची ही थोडीच सोय, शिवाय जगाशी दुरदूरपर्यंत न होणारा संबंध. त्यातच दळणा वळणाचे दुर्भिंक्ष, कोणत्या तरी पायावाटेने वाटसरु होवून अल्पशा गरजांचे अल्पसे उदरनिर्वाह, अतिशय कष्टाळू शिवाय निसर्ग निर्मित परिस्थितीवरही मात करुन नेहमीच चेहेऱ्यावर स्मित हास्य करीत जीवनाचा आनंद घेणारे जनजीवन. चेहेऱ्यावरील सुरुकुत्यांचे ते जाळे जणू त्यांच्या अपरिमीत कष्टाची साक्षच देतात. यासर्व परिस्थीतीच्या अनुभवानंतर सहज आपल्या सुसहय जीवनाशी होणारी याची तुलना हा मोठा विरोधाभासच आहे. कारण सहज आणि अगदी सोप्यारीत्याने उपलब्ध असणारे जीवनसुसहय करणारी साधने शिवाय निर्सर्गाचे संपुर्ण सहकार्य, त्यातच सुसंस्कृत आणि सुशिक्षितेची मोलाची साथ, इतके असूनही नेहमी आपण असमाधानीच असतो. कारण सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टीची आपणास किंमत नसते आणि अशा दुर्गम ठिकाणी आल्यावर त्यासर्व गोष्टीची आपणास किंमत जाणवते. अल्पशा साधन सामुग्रीतही कोणत्याही भौगोलीक परिस्थितीत जीवनाचा प्रवास आनंदमयी होउ शकतो. हेच आणि हेच एकमेव सत्य आहे याची अनुभूती येथे येते. आपण जगत असलेल्या सामन्य जगाच्या पलीकडे एक असामान्य जग अनुभवायला मिळते, जे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून खूप दूर असलं तरी त्यांची नाळ ही त्यांच्या परंपरेशी घट्ट जुळलेली असते आणि त्यातच ते आनंदी आणि समाधानी असतात.

जसे हिमालय म्हणजे वर्षादोन वर्षातून एकदाच भेट, पण आमचा सहयाद्री मात्र जणू घरचाच. ‘कधीही यावं कधीही जावं’ कधी मनात येईल तेंव्हा आठवडयाच्या कोणत्यांही दिवशी आपली सॅक पाठीशी अडकवून बाईकला किक मारुन निघायचे. कधी कात्राबाईच्या माथ्यावर खुळया ढगातून वर डोकावणारे रतनगड, AMK ची अती प्रचंड आणि अती कणखर पर्वत श्रृंखला निहाळायची, कधी साल्हेरच्या परशुराम टोकावरुन अस्तांचलात चाललेले रवीबिंब पहात बसायचे, धोडपच्या किंल्यावरुन सातमाळयाच्या डोंगररांगांवर श्रावणात रंगलेले उन पावसाचे खेळ पहात रहायचे. तर कधी पिंपळा किल्ल्याच्या नेढयात स्वतःलाच शोधत फिरायचे, कोयनेच्या दुर्गम खो-यात सप्टेंबरात विविधरंगी फुलांच्या सडयातुन आलेल्या पाउल वाटेवर अनवाणी हुंदडायचे. रांगणा किल्ल्याच्या कोकण दरवाजावर उभे राहुन चांदण्यांचे आवाज ऐकत कोवळया उन्हाच्या प्रतिक्षेत तासनतास घालवायचे. कधी त्या जावळीच्या गूढ खो-यात मराठयांच्या शौर्यगाथांचे स्मरण तर कधी पिंतळ खो-यातल्या त्या सातवाहनांच्या लेण्यांचे भ्रमण, शौर्य आणि अहिंसा परमोधर्म या दोन परस्पर विरोधी मार्गाचा हा अनोखा मिलाफ.

असेच एकदा दैनंदिन दिनचर्येस कंटाळून बाईकसह कोयनेची एकटीच वाट धरली. त्या दुर्गम भागात रस्त्यांचे दुर्भिंक्ष, ना उगम ना अस्त, अशा या ओबड धोबड रानातील गाडीसह हांडांना खुळखुळवणारे हे रस्ते. जवळच्या वाडीत जायच तरी साधारणत: 2 तासांची पायपीट किंवा दवाखान्यात जायचे असल्यास त्याहून अधिक होडीच्या साह्याने होणारा प्रवास. येथे प्रकर्षाने जाणवणारा भाग म्हणजे, प्रत्येक वाडीत दवाखाने नाहीत पण स्मशाने हमखास, असा काहिसा नजारा पाहून मनात कुठतरी चलबिचल झाली. असेच काहीसे अंतर गेल्यावर लिफ्ट मागणा-या आजी भेटतात.उत्सुकतेने माझे येण्याचे प्रयोजन त्या विचारतात आणि स्वतःचीच रामकहाणी एकवतात. ‘येथे काहिच नाही, का आलास? आम्ही कसे दिवस काढतो आमचे आम्हालाच माहित, पोरं सर्व मुंबईला इथं आम्ही आहेात म्हणून चाललय ! आम्ही गेल्यावर येथे कोणच नसणार, फक्त टिचभर शेतं, पावसात येणारी भात नाचणीची खाचरं तशातच गव्यांचा व रानडुकरांचा हैदोस’.

अशा प्रतिकूल परिस्थितीतही तेथील लोकांच्या जीवनाचा हा प्रवास सदैव सुरुच. या परिस्थितीतही ‘मनाची श्रीमंती’ या त्यांचा उदारमतवादी स्वभावाचे नेहमीच दर्शन होते. कारण नंतरच्या भेटीत आवर्जून होणारे आतिथ्य, जेवणाचा पुन्हापुन्हा तो आग्रह, शिवाय रानमेव्याची शिदोरी तसेच कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली मदत, ही आमच्यासाठी खुप मोठी गोष्ट होती. भटकंतीच्या प्रवासात अनेक अनुभव येतात. शहराजवळील गावे मुख्यत्वेकरुन व्यापारी वृत्तीची जाणवतात. सुखसोयी व गरजा पुरवीण्यासाठी धनद्रव्याची अपेक्षा ठेवतात. पण दुर्गम व आदिवासी भागात हे चित्र मात्र अतिशय निराळे असते. ती आपुलकी आणि तो आग्रह आणि निर्मळ आदरसत्कार यात मनाची श्रीमंती अनुभवली आणि त्याच मुळे येथील लोकांशी कायमचे ऋणानुबंध जुळतात. ना नात्यातले ना जातीचे आणि ना कोणताही व्यवहारिक संबंध, पण तरीही भावनीक नाते घट्ट व मजबूत होत जाते आणि तिथूनच पुढे विचारांची देवाणघेवाण सुरु होते.

गतवर्षाचा विचार करता याही वर्षी अनेक दिग्गज मंडळी भेटली. ज्यांच्या परीस्पर्शाने जीवनाला नविन उभारी मिळाली. त्यापैकी आपले दुर्ग महर्षी श्री Pramod Mande​ सर ज्यांनी आपल्या मिष्कील वाणीने गत वैभव आणि पुर्वजांच्या शौर्याची ओळख तर करुन दिलीच तसेच वर्तमानाच्या आपल्या विरोधाभासाचीही जाणिव करुन दिली. त्यापैकीच एक, इतिहासत गुंतलेले आणि पर्यावरण रक्षणाचा वसा घेतलेले श्री.Damodar Magdum​ सर, ज्यांनी मराठी देशा या वेबसाईट व्दारे महाराष्ट्राचा इतिहास घरोघरी पोहोचविला. येथे मुद्दामहुन उल्लेख करु इच्छितो की सहयाद्रीत Photography चे विविध प्रयोग करणारे, तसेच सहयाद्रीतील प्राणी, पक्षी, वनस्पती व पर्यावरण याचे गाढे अभ्यासक श्री. Vivek Kale​ सर, जे या सर्व बाबींचे Documentation करीत असतात. ज्यांच्या भेटीने फोटोग्राफीत आपण विविध प्रकारे पैलू शोधू शकतो, याचे मार्गदर्शन होऊन आणि नविन वर्षात फोटोग्राफीच्या विषयात राबविण्याच्या नवनवीन संकल्पनांचे ध्येय आखले गेले. आपल्या सारख्या सर्व भटकंती करणाऱ्या मित्रांना एकत्र आणून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देऊन, आपल्यात सामाजिक कर्तव्याची जाणिव निर्माण करणारे आपले लाडके श्री बोम्बल्या फकीर​ (रवी पवार) , त्याच प्रमाणे दुर्गसंवर्धनासाठी स्वतःला झोकून घेतलेल्या झुंजार शिलेदार संस्था, शिव सह्याद्री दुर्गसंवर्धन, गडवाट, सह्याद्री प्रतिष्ठान, अशा अनेक संस्था व कार्यकर्ते . अशा लोकांची समाजासाठी व पर्यावरणासाठीची धडपड पाहून त्यात आपलाही खारीचा वाटा असावा अशी प्रेरणा मिळते.

माझे मित्र श्री. Pankaj Wadekar​ यांनी लोकां कडून विविध कपडे व खेळणी अशा वस्तू जमविल्या, त्यात मी ही अजून भर घालून सदर वस्तू दुर्गम भागातील आपल्याच बांधवांपर्यंत पोहोचत्या केल्या. श्री Pravin Murkute आणि त्यांच्या सहका-यांनी ‘वसुंधरा अभियानांतर्गत’ बाणेर टेकडी परिसरात वृक्षारोपण व संवर्धनाचा उपक्रम यशस्वीरीत्या राबवीत आहेत. त्याच करीता प्रविण यांनी आपल्या गच्चीवर 300 ते 400 प्रकारची विविध फळ झाडांची रोपे लहानाची मोठी केली, त्यातील काही रोपांचे वितरण जिथे Trek ला जातो तेथील नागरिकांत आम्ही केले. त्यांना वृक्षसंवर्धनाचे प्रबोधन करुन, सदर रोपे त्या परिसरात लावण्याचा व त्यांच्याच व्दारे जोपासण्याचा नविनच उपक्रम सुरु केला. तसेच श्री आनंद पांडे यांनी जेथे जावू तेथे बीज रोपणाचा कार्यक्रम याही वर्षी जोरात चालू ठेवला, 2015 मध्ये गडकिल्यांच्या स्वच्छतेची मोहिम राबवीली त्याच प्रमाणे याहि वर्षी मित्रांच्या मदतीने साल्हेर,रतनगड, धोडप या किल्ल्यांवरही जवळपास 80 टक्के कचरामुक्तीचे काम केले. तसेच प्रत्येक Trek मधून बाजूला काढून ठेवलेल्या रकमेतून सहयाद्रीतील लोकांच्या गरजेसाठी काहीतरी उपयुक्त उपक्रम राबविण्याचा मानस आहे. त्याच प्रमाणे आमचे आर्टिस्ट बंधू श्री. Khemchand Khairnar​ यांच्या ‘ललीतकला प्रबोधिनी’ या संस्थेच्या माध्यमातून तळागाळातील नवोदित कलावंतांसाठी पुणे येथे कला प्रदर्शनाचे आयोजन आणि धुळे येथे फोटोग्राफी या विषयाची कार्यशाळा आयोजित केली. आपण आपले छंद व कला जोपासतच असतो, ते करीत असतांना सामाजिक भान ठेवून आपल्या उपक्रमाचा समाजासाठी उपयोग करुन, त्यासाठी प्रबोधन करणे याचा आनंद काही औरच असतो.

भटकंतीच्या या प्रवासात अनेक निस्वार्थी, उदार अंतकरणाची व्यक्ती भेटतात. मग त्यांच्याशी आपले कायमचे ऋणानुबंध जुळतात. जीवनात चांगली संगत लाभणे हे ही एक भाग्यच असते. प्रत्येकात चांगले गुण व स्वभाव वैषिश्टये असतात. त्यांचे हे सारे गुण वैशिष्टय पाहून आपण त्यांच्या समोर फारच छोटे आहोत हे मला नेहमीच वाटते.

मला ही असे अनेक मित्र भेटले त्यापैकी –
Dipak Balwadkar, Johnson Tricclore, Aditya Budrukkar​, Subodh Atitkar
, Prashant Patil​, Anand Pande, Yogesh Jadhav​ Swanand Kulkarni​, Anuradha Gokhale, Ravindra Waghmare​, Acs Poonam Pacharne​, Shraddha Ashok Mehta​ Vishal Naikwadi​ , Vishal Laxman Sawant​, Prashant Babanrao Lavate-Patil​, Onkar Oak​, Samyak Vimal Masu​, Sudhakar Karale​, Chetan D Paliwal​i, Pankaj Wadekar, Vijay Birajdar​, Kamal Varma​, Samir Kadu​ , Kuldeep Yadav​, Rahul Sudhakar Karale, Amit Shripad Kulkarni​, Chinmayi Nayan Parab​ Anup Bokil, Ajay Veersen Jadhavrao​, Rahul Shivaji Papal​ Abhijeet Pasalkar​. Abhishek Kumbhar​, Shruti Satish Khandare​, Renuka Shelar​, Sudarshan Sutar​, Amit Kodere​, Dinesh Anantwar​, Prasad Pawar, Soumitra Inamdar , Bhushan Mate​, Suhas Desale, Vinayak Chinchwade​, Ashok Pokharkar​, Sharad Navgire​

या निसर्गात आणि त्यात भेटलेल्या नानाविविध माणसांचे व मित्रांचे जेव्हा सदगुण आपण वेचत जातो तेंव्हा राग,लोभ,मद, मोह,मत्सर याचे बंध कधीच निखळून पडतात आणि त्याचमुळे तुमचे व्यक्तिमत्व खुलते आणि तुम्हीही घडत जातात.

‘Your time on this planet is limited; Your Quest to explore is not’ आपण भटकंती का करतो ? याची उत्तरे May be आपणास कधीच मिळणार नाही. पण हेच प्रश्न याच अनवट वाटांवरती पुन्हा पुन्हा घेवून जातात. या वाटा पुन्हा पुन्हा जगावाश्या वाटतात. जीवनातला प्रत्येक क्षण अन क्षण समरस होवून जगावासा वाटतो, केवळ स्वतःसाठीच नाहीतर इतरांसाठीही.

कधी कधी वाटते की या आजच्या कृत्रिम, आभासी व व्यवहारी जगाच्या पल्याड, कधीतरी वाट वाकडी करुन याही वाटेचे वाटसरु तुम्ही व्हा, आपणसही यात एक निराळी अनुभूती होईल. ज्यात अव्दितीय असा सौंदर्य खजाना दडलेला आहे.

या वर्षीची सर्वात महत्वाची Achievement म्हणजे देशातील फोटोग्राफी क्षेत्रातला 2016चा सर्वोच्य अशा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत होण्याचा मान मला मिळाला ‘National Award for Outstanding Work in field of Photography’. या पुरस्कारासाठी माझी निवड होणे याचा मी कधी स्वप्नातही विचार केलेला नसतांनाही मिळालेला हा पुरस्कार. माझ्यासाठी जणू गेल्या काही वर्षाच्या तपस्येची पावतीच होय. मला वाटते की यश हे माझे एकटयाचे नसून त्यात माझ्यासमवेत असलेला निसर्ग, माझी आई आणि मित्र यांचाही मोलाचा वाटा आहे. मागील पाच वर्ष मी Canon 1000D या Basic DSLR वर काम केले, तो कॅमेरा घेणे ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती आणि आताही जेव्हा मी Canon 6D High end DSLR घेतला ही, तर त्याहून ही अधिक मोठी गोष्ट आहे. कारण त्या वस्तुंना आणि त्या किंमतीला आपण किती पात्र आहोत या चिंतेने माझी झोप केंव्हाच उडाली.

पुर्वी सुरुवातीच्या काळात फोटोग्राफीसाठी नेहमीच बाहेर जावे लागे. तेंव्हा माझ्या चिंतेपोटी आजी आजोबा सारखे आईस बोलत असत. कुठे फिरतो? काय करतो? घरात थांबत नाही. त्यामुळे होणारा आईचा कोडंमारा मी जवळून अनुभवला. त्यावेळी मनात अतोनात वेदना होत असतं. नेहमीच बाहेर फिरण हे सातत्याचे होवून बसंल. नंतर माझ्याप्रती आईचा विश्वास वाढू लागला, काही तरी वेगळं करतो आहे याची तिला खात्री झाली. त्यामुळेच तिने मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी Full freedom दिला. असा फ्रिडम आणि असे आयुष्य फार कमी व्यक्तींना लाभते. आणि मग ठरवलं की जे काही करायचे ते टॉपचे आणि जगावेगळे करायचे. ‘चांगला कलाकार हा आधी चांगला माणूस असतो’ असा उपदेश ही आईने केला.

नेहमीच्या 18-20 तासांच्या Hectic schedule नंतर लागलीच फोटोग्राफीसाठी Outdoor / Trek ला बाहेर जाण्याचा आधीच प्लॅन ठरलेला असतो, तेंव्हा आई काळजी पोटी म्हणते की या वेळी कुठेही जावू नकोस घरातच आराम कर. पण मी तिला कस सांगू की ‘आराम’ व’ झोप’ हे शब्द मी माझ्या आयुष्यातून केंव्हाच हददपार केले आहेत. माझे जीवन हे माझ्या आईचे आणि या मातृभूमीचे काहीतरी देणे लागते याची मला सदैव जाणीव होत असते.

‘You make your own world & world makes you’

दिल्लीच्या राष्ट्रीय पुरस्काराच्या त्या दिवशी स्टेजवरुन खाली आल्यावर आईचे डोळे पाणावले व मन भरुन आले. त्यावेळी तिची माझ्या पाठीवरील शाबासकीची थाप देउन, उच्चारलेले तिचे ते शब्द आजही कानी गुंजत असतात. हा एक माझ्या साठी स्वर्णक्षण होता. त्यात केवळ 2016चा हा पुरस्कारच नाही तर आयुष्यातल्या गतकाळाच्या मेहनतीचे ते सार आहे. ते शब्द होते

‘I am proud of Shri !’

 

काल पर्यंत जीवनाला कुठल्यातरी चौकटीत बसवलयं ।

 आजपर्यंत मी माझ्या मनाला नेहमीच फसवलंय ।।

 दृष्टीतल्या माझ्या सृष्टीत मी नेहमीच हसवलंय ।

 म्हणून वेडा होवून जगाला मी नेहमीच फसवलयं ।।

 

– श्रीकांत
.
——————————————————————————
** Feel free to share & download, if you like it (y) ***
——————————————————————————-

 

_______________________

 

Join Me on FACEBOOK –

 

_______________________