ग्रेट रण ऑफ कच्छ ( भाग १ )

कच्छ हे प्रसिध्द आहे ते त्याच्या रण उत्सवामुळे, विस्तीर्ण पसरलेल्या समुद्रसपाटी सारख्या अथांग मैदानात पांढ-या मिठाचा ते चकाकणे,  भर दिवसाच्या 12 वाजेच्या उन्हात त्याकडे बघण आपणास शक्य होत नाही. कारण पांढरे किरण अतिशय तीव्र असतात. पण तोच नजारा मात्र रात्री फारच निराळा असतो. कारण पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात मात्र त्या पांढ-या शुभ्र मैदानाचे रुप काही औरच असते. शिवाय त्यावर वावरणारी गुजरातची रंगीबेरंगी संस्कृती म्हणजे सोने पे सुहागाच. हा अनोखा संगम फक्त याच काळात पहावयास मिळतो.