Great Rann of Kutch ( Part I )

ग्रेट रण ऑफ कच्छ ( भाग १ )

 

कच्छ के नमकीन सफर के क्या कहने ।       जैसे खानेमे नमक के गहने ।।

 रास्तेमे है पाटण की साडी पटौला ।          रानी की वाव का नजारा निराला ।।

मोढेरा मे सुरज के मंदीर के क्या खुब नक्काशे ।   पुरखो के वो ठाठ बांट ।  भुज के वो  राज प्रासाद ।। 

यादे ताजी है अभी पुरानी  ।           शान मे खडे है धौलावीरा नुरानी ।।

.

पुर्वी  केंव्हातरी इतिहास व भुगोलाच्या पुस्तकात वाचलेली माहिती आणि रिफयूजी सारख्या फिल्म मधून पाहिलेले कच्छ जवळून अनुभवावे म्हणून साधारण 2014 च्या सप्टेंबर मध्ये ठरवले. कच्छ च्या मुसाफिरीचे 3-4 कारणं होती. नुकताच राजस्थान गुजरात मार्गे फिरुन झाला होता आणि कुठेतरी रन ऑफ कच्छ 250 किमी असे वाचण्यात आले. तेव्हाच मनाशी ठाम होते की कच्छ दर्शन व्हावे.

रण ऑफ कच्छ

कच्छ हे प्रसिध्द आहे ते त्याच्या रण उत्सवामुळे कारण नोव्हेंबर डिसेंबर या काळात आकाश निरभ्र असते. थोडा उष्मा ही कमी असतो पण रात्री थंडी मात्र प्रचंड असते. विस्तीर्ण पसरलेल्या समुद्रसपाटी सारख्या अथांग मैदानात पांढ-या मिठाचा ते चकाकणे,  भर दिवसाच्या 12 वाजेच्या उन्हात त्याकडे बघण आपणास शक्य होत नाही. कारण पांढरे किरण अतिशय तीव्र असतात. पण तोच नजारा मात्र रात्री फारच निराळा असतो. कारण पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात मात्र त्या पांढ-या शुभ्र मैदानाचे रुप काही औरच असते. शिवाय त्यावर वावरणारी गुजरातची रंगीबेरंगी संस्कृती म्हणजे सोने पे सुहागाच. हा अनोखा संगम फक्त याच काळात पहावयास मिळतो. कारण उन्हाळयात व पावसाळयात इथे फक्त रणरणत, रखरखीत उन आणि गरम वाफा या व्यतिरीक्त काही नाही.

      सफरीची जुळवाजूळव आम्ही घरचीच मंडळी नेहमीचीच वर्षातून सहा महिन्यातून एकदा अशा  ऑफबिट सफरीवर निघणारी. सारे कसे एक विचारी कारण कला हा आमच्यातला एक धागा. खेमचंद व रुपेश हे दोघेही आर्टिस्ट, दिशांत, भुपेंद्र हा इंजिनीअर आणि मी फोटोग्राफर. असा आमचा जथ्था साधा ऑक्टोबर 14 च्या ऐन दिवाळीच्या रात्री कच्छ कडे निघाला. ध्येय कच्छ चे होते, पण रस्त्यात गुजराजच्या अनेक गोष्टी आम्हाला खुणावत होत्या.  कुठेही न थांबता सलग 700 किमी प्रवास करुन छोटा रण येथील धोलावीरा परिसराजवळ आम्ही रात्री 2 वाजता पोहोचलो. निर्जन रस्ता अमावस्येचा किरर्र अंधार आणि अशातच एका पेट्रोल पंपावर आम्ही आसरा घेतला. पहाटे पाच वाजता शेजारीच एका देवस्थान वजा आश्रमात आम्ही आमचे प्रात्यविधी उरकून सात वाजता धोलाविरा गावात पोहोचलो. चहाची वेळ होती म्हणून एका छोटया टपरीत सकाळी चक्क 7 वाजता चहा बरोबर गरमागरम  कच्छी दाबेलीवर ताव मारला एरवी पुण्यात सायंकाळी मिळणारी दाबेली आम्हाला सकाळी सकाळी आणि तीही अतिशय गरमागरम मिळाल्याने आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. धोलाविरात शिरल्या शिरल्या भारतीय सेनेच्या जवानांची एक तुकडी गस्तीवर पहावयास मिळाली तेंव्हा कळालेकी येथून अगदी 20 किमी अंतरावर पाकिस्तान बोर्डर आहे.

धोलाविरा

      मोहेंजोदडो  आणि हडप्पा या अति प्राचीन सिंधू संस्कृतीची भारत आणि पाकिस्थानातील जी  काही 4- 5 शहरे होती ती त्यापैकी भारतात दोन शहरे आजही काहीशी शाबूत आहेत. त्यात 1 धोलाविरा आणि 2 लोथल, हे दोनही शहरे गुजरात राज्यातच आहेत. त्यातील धोलाविरा हे आमच्या वाटेवर होते. तो ही एक आनंद होता की आमच्या पुर्वजांची अति प्राचीन सांस्कृतिक भुमी आम्हास पहावयाची होती. जे काही अवशेष आहेत, ते आम्हाला अभ्यासायचे होते.

      धोलाविरा हे एक बेट आहे. चारही बाजूने कच्छचे रण आहे आणि त्यात मधोमध एका टेकडीवजा उथळ डोंगरावर हे शहर वसलेलं आहे. शहराची रचना चार थरात होती. सर्वात वरती त्या शहरातील जे राजे अथवा महाजन तेथे रहात होते व त्या खालोखाल मानाप्रमाणे पायथ्यापर्यंत नगररचना आहे. सार्वजनिक स्नानगृहे, प्रजेसाठी क्रीडांगण अथवा राज कारभाराची जागा, ठाओडी व खोटाडा शैलीची गोलाकार व शंषंक्वाकृती घरे आणि महत्वाचे म्हणजे दूर दूर पर्यंत गोडया पाण्याचा लवलेश नसतांनाही जनजीवन सुसहय होण्यासाठी रेन वॉटर हारवेस्टींग च्या पध्दतीचे प्रथम दर्शन आम्हाला झाले.या रेनवॉटर हार्वेस्टींगची गरज आज हजारो वर्षानंतर आम्हाला जाणवली, ती आमच्या पुर्वजांची भौगोलिक गरज होती.  टेकडीवर पडणारे पावसाचे पाणी दगडी नाल्यामंधून हौदात व हौदातून तळाच्या विहीरीत सोडून विहिरीतून मग सर्व प्रजेला त्याचा पुरवठा केला जात असल्याचे पुरावे आजही तेथे शाबूत आहेत. धोलाविराच्या मागच्या बाजूस साधा 4 किमी अंतरावर रणात जीवाश्म पार्क आहे. झाडे, माणसांची हाडे यांचे जिवाश्म तेथे जतन करुन ठेवलेली आहेत.

      वेळ दुपारची होती आणि गावही खूप लांब होते. जेवणाची वेळ झाली होती त्यातच एका गावक-याने तासाभरातच आहे त्याच ठिकाणी अस्सल कच्छी जेवण म्हणजे बाजरी रोटी, आलू टमाटर साग, देसी घी, छाछ आणि गुळ असे स्वादिष्ट भोजन, तेही धोलाविरासारख्या पवित्र भूमिवर आम्हाला उपलब्ध करुन दिले. ती आमच्या साठी मोठी मेजवानीच होती. भरपेट जेवण घेवून पूर्वजांच्या भूमीला वंदन करुन आम्ही पुढच्या प्रवासास निघालो.

क्रमश:.

 

ग्रेट रण ऑफ कच्छ – भाग २ साठी येथे क्लिक करा / For Part II Click here

ग्रेट रण ऑफ कच्छ ( भाग २ )

_______________________

 

Join Me on FACEBOOK –

 

_______________________