Trekking

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो
तोह जिंदा हो तुम
नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो
तोह जिंदा हो तुम
हवा के झोंकों के जैसे आजाद रहना सीखो
तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो
हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें
हर एक पल इक नया समां देखें यह निगाहें
जो अपनी आँखों में हैरानियाँ लेके चल रहे हो
तोह जिंदा हो तुम
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो
तोह जिंदा हो तुम
_______________________

 

कोयनेच्या रूंद पात्रातल्या त्या निर्मनुष्य बेटावर, उंचच उंच, घनदाट आणि प्राचिन जंगलाच्या सांनिध्यात सांयकाळ जवळ येत होती. मनातल्या आणि आसमंतातल्या रंगांच्या होळी समवेत उन सावलीच्या खेळता घरी परतणारा सुर्य आणि चिवचिवाट करत घरच्या ओढीने मार्गस्थ झालेले पाखरांचे थवे. अशा या माझ्या सर्वात आवडत्या ठिकाणी …

अशा कित्तेक संध्याकाळांचा साक्षीदार मी, पण आजची संध्याकाळ  नेहमीसारखीच  वेगळी आणि अनाकलनीय…

‘शाळा कॉलेजात असतांना निबंध स्पर्धेत नेहमीच प्रथम येणारा मी, माझ्यातच हरवल्याने बरीच वर्षे लिखाणापासून खुप लांब गेलेलो, पण आज अचानक मनातील विचार कागदापवर डोकावून पहात होते आणि पुन्हा लिहीण्याचा योग आला !

नेहमीच शांत आणि अबोल असणारा मी, हे डोंगर, कडे, पशु, पक्षी, झरे, धबधबे, पायवाटा यांकडे कधी आकर्षित झालो. माझे मलाच समजले नाही.

आज अचानक या निर्जन आणि निर्मनुष्य पण सृजन ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात मन शुन्यात गेले असतांना अचानक कुठेतरी मागच्या आठवणी उचंबळून आल्या आणि एक एक क्षण मागे मागे जात मी खुप खूप दुर निघून गेलो.

 Yana Rocks, Karnataka,Western Ghats,India

साध: आठेक वर्षांपूर्वी असंच एकदा मित्रांसोबत लोहगडावर केलेली भटकंती एक विरंगुळा असावा असे वाटले होते. पण भटकंतीच्या या प्रेमाचा प्रवास आज तागायत सुरूच आहे. भटकंती म्हटलं की आठवताता या प्रेमळ प्रवासाचे अनेक थांबे.

गुलाबी थंडीत दाट धुक्यात बुडालेली आणि सुर्योदयाच्या स्वर्ण उन्हात न्हाउन निघालेली  अशी कोयनेची  असंख्य खोरी …

अणुष्कुरा तील निळया पिवळया सप्तरंगी फुलात हरवलेली ‘बर्की’ गुहेची रानवाट…,

वाघांच्या साम्राज्यातला कांदारडोहा सारख्या, दुधाळ व फेसाळ निरंतर कोसळणाऱ्या धबधब्याचा  तोरा  वाघासारखाच  भव्य आणि दिमाखदार…

इंद्राई किल्ल्याच्या पुरातन गत वैभवरून आणि उंचीवरून दिसणारी रूबाबदार आणि  अजस्त्र सातमाळयांची डोंगर रांग …

कात्राबाईवरून दिसणारे ढगात बुडालेल्या रौद्र, विराट आणि सर्वांग सुंदर सहयादिची डोंगर रांग…

पुर्ण गडावरून जाणवणारे सागराचे भव्य आणि विहंगम दृष्य,  खळखळत्या व उसळत्या लाटा आणि शांत पण धिर गंभीर वाहणारा सौंम्य वारा…

चित्रदुर्गच्या उंचच उंच डोंगरावरील घरंगळते पण स्थीर व मोठाले पहाड आणि लेपाक्षीची नख-शिखांत सौंदर्याने नटलेली संपुर्ण नगरी …

कर्नाटकाच्या याना रॉक लेण्यातील उन सावलीचा अनुपमखेळता स्वताच हरपणारा  आणि त्यात स्वत:ला शोधणारा मी…

राजा कृष्णदेव  देवरांच्या हंपी साम्राज्यातील कलेच्या श्रीमंतीचा  अनुभूती घेणारा मी…

कच्छच्या रणरणत्या रणातील आपल्या पुर्वजांच्या राहणी मानाच्या पावूल खुणा असलेले धोलावीरा  आणि मिठाची पांढरी पण नमकीन संगत…

त्यातच लखपतच्या किल्ल्यावरून दिसणा-या एकाच दृष्यातील समुद्र आणि कच्छच्या रणाचा विरोधाभास  आणि दुरवर कोठेतरी सुर्यास्त् साधाणारा पाकिस्तानचा प्रदेश…

रंगबेरंगी  राजस्थान, राजवाडे, किंल्ले, वाळवंट, उत्सव, आणि उत्साह …

 Pangong Tso (Pangong Lake)

हिमालयाच्या झान्स्कारचे (Zanskar Valley) पावलोपावली बदलणारे लाजवाब असे निसर्ग सौंदर्य, हिम-शिखरे आणि त्यांचे पाण्यातील प्रतीबिंब …

हिमालयातील अति प्राचीन, अति दुर्गम आणि निर्जन अशा ‘झांगला’ किल्ल्यावरून दिसणारे चोहिकडील मनमोहक उंचच उंच हिमाच्छादित पर्वत रांगा…

त्सो-मोरिरी (Tso Moriri) वरून दिसणारे  रात्रीचे भव्य दिव्य असे तारांगण…

चंद्रतलाचे (Chandra Taal) नितळ निळेशार आणी चहुबाजूने  वेढलेले पाणी…

अशा सौंदर्यपुर्ण आणि विविध्यपुर्ण माझ्या मातृभुमीच्या निसर्गाचे असामान्य पैलू अनुभवतांना आणि त्यांच्या आठवणीत मला नेहमीच स्वर्गीय आणि स्वर्णीम अनुभुती मिळते.

जगातील प्रत्येक गिर्यारोहकास आपण का भटकंती करतो असा नेहमीच प्रश्न पडत असतो.या भटकंतीने मला काय दिले ? तर मी म्हणेन जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, सौदर्य दृष्टी आणि निसर्ग सहवासाचा निखळ आनंद, त्यात कडू गोड आठवणी जरी असल्यातरी माझे पहिले पेम म्हणजे भटकंती. दैनंदिन कालचक्रातून थोडंसं बाहेर पडून थोडं धाडस, थोडं साहस, थोडा संयम आणि थोडा आत्मविश्वास  यांच्या जोडीला स्वत:ला सिध्द करण्याची संधी.

गिर्यारोहणाचा किंवा भटकंतीचा संख्यात्मक उच्चांक गाठून इतरांत गुणात्मक संख्या मिरविण्यापेक्षा प्रत्येक मोहिमेतील क्षण अन क्षण अनुभवणे व पंचेंदियांदवारे त्यास मनापर्यंत पोहोचवणे. असा प्रत्येक क्षण, प्रत्येक दृष्य, दृष्य अन दृष्य कॅमेरॅत स्तब्ध करणे मी पसंत करतो. म्हणून भटकंती सोबतच जुळालोले छायाचित्रणाचे  सुर साध्या फिल्म कॅमेरॅने सुरू होवून निकॉन कुल पिक्ससह आज कॅनॉन 6 डि एस. एल. आर. वर येवून विसावले.

 

Bajaj caliber

 

आठवडाभराच्या पाच दिवसांच्या भरगच्च कामकाजानंतरचा शनिवार व रविवार म्हणजे आपला हक्काचाच, शुक्रवारी सायंकाळीच माझी सॅक, कॅमेरा आणि मोटर सायकल जणू विरहा नंतरच्या भेटीसाठी आसूलेल्या अवस्थेत वाट बघत असतात. आणि मग भल्या पहाटेच गाडीची पहिली किक पक्षांच्या किलकीलाटाच्या आधिची असते. प्रत्येक सफरीत जातायेतांनाचे अविस्मरणीय असे अनुभव जसे…

 Harishchandragad

हरिश्चंद्रगडाच्या नळीच्या वाटेने चोवीस तासात केलेली विक्रमी चढाई आणि कोकण कडयावर भर पावसात चिखल पांघरून काढलेली रात्र…,

माझ्या मित्रासमेवतचा (श्रीधर पुरंदरे) केलेला कांदाडोहाचा आणि प्रचिती गडाचा जंगल ट्रेक, हरवलेली वाट आणि रानगव्यांच्या चांदोलीत फक्त दोघांतच काढलेली अमावस्येची भयावह रात्र….,

नव वर्षाच्या स्वागता पित्यर्थ 31 डिसेंबर रोजी सर केलेले, एकादमातले अंजनेरीचे तीन डोंगर सुळके…,

ढाक ते राजमाचीचा अचानक ठरलेला नाईट ट्रेक, हरवलेली वाट आणि सापांचा सुळसुळटा…,

अजस्त्र संहयादि रांगेवरून भव्य असा सुर्योदय अनुभवण्याच्या लालसे पोटी मे महिन्याच्या  भर उन्हात केलेली चढाई आणि हुडहुडी भरणा -या थंडीत सोसलेली कात्राबाई वरील रात्र …,

जावळीच्या जंगलात एकाच दिवसाच्या मोहिमेवर असतांना गाडीच्या तुटलेल्या क्लच प्लेट मुळे काढावे लागलेले चार दिवस…,

 India

 Solo Rides, Treks & Camping 

कोयनेच्या सौदंर्याचे पैलू टिपण्यासाठी मोटरसायकल सह एकटयाने तर कधी मिंत्रांसमवेत केलेल्या असंख्य सफरी…, कोयनेतील कोणत्याही शिखराची निवड करून स्वत:च वाटाडया होवून, चढाई करून आणि केंव्हातरी सायंकाळी डोंगरमाथ्यावर पोहचून स्वत:च बनवलेल्या सुपावर आणि सायंकाळच्या त्या लावण्य रूपावर ताव मारून रात्रीच्या चंद्रता-यांच्या यांसोबत पंचपक्वांन्यचा मनमुराद आस्वाद घेवून निवांत पडावे आणि अदिवतीय व अवर्णनीय अशा पहाटेच्या सौंदर्याचे स्वप्न पहावे !

 

Leh Ladakh Bike Trip

 One Life to Ride – बाईकवरचं बिऱ्हाड
30 Days Trans Himalayan Biking Expedition

 Chushul, Rezang La, Leh Ladakh

 The most astonishing moment during 30 Days Trans Himalayan Biking Expedition
Make your own path…Route without roads, Open border area at Chushul, Rezang La.

The route to Chushul (via Merak or Loma), with no roads no signboard, and the road has to be tracked by the Tyre marks on army convoys. And the closest to the Chinese border, with a 17000ft, unfortunately, access to Chushul and Rezang La War Memorial is restricted, due its closeness to the Line of Actual Control

स्वत:ची क्षमता आजमावण्यासाठी, आणि स्वत:ला सिध्द करण्यासाठी तीस दिवसांची दोघातच केलेली हिमालयातील मोटरसायकल मोहिम म्हणजे एक हटट आणि जिद्य कारण चीनच्या  आंतरराष्ट्रीय सीमेजवळ नादुरूस्त झालेली मित्राची (प्रवीण मुरकुटे) मोटरसायकल, आणि समुद्रसपाटीपासून 16,000 फुट उंचावरील उणे तापमानात अनुभवलेले नाईट कॅम्पींग…,

अशा अनेक सफरींत हमसफर झालेले मित्र, स्थानिक गावकरी, गुराखी तसेच हिमालयाती बौध्द भिक्कु यांजकडून कळत नकळत आत्मसात केलेले संस्कार …

अशा अनेक कडु गोड आठवणींना आणि अनुभवांना कुरूवाळत अशी भटकंती सुरूच आहे. साध: 150 किल्यांची   भटकंती झाल्यावर 3 वर्षांपुर्वी असे जाणवलेकी ससा कासवाप्रमाणे आंधळी शर्यत जिंकण्यापेक्षा, सहयाद्री असो वा हिमालय अथवा देशातील कुठलाही प्रदेश यांचा कालौघात आणि मनुष्याच्या विपरीत हस्तक्षेपाचा व अतिक्रमणाचा विपरीत परिणाम होवून नश्वर होणा-या या बाबींचे डोळसपणे संशोधन, डॉक्यूमेंटेना आणि छायाचित्रणासह साहित्तीक प्रस्तूतीकरण करणे, म्हणजे एकेका स्थळी तिनही ॠतु अनुभवून त्यावर संशोधन करण्यासाठी सलग 2 ते 3 वर्षे विविध प्रकल्प राबविणे, जेणे करून त्यायोगे सदर माहिती, छायाचित्र असा साहीत्य संग्रह लोकांपर्यंत पोहचवणे आणि या साठी संवर्धन आणि प्रबोधन करणे हा एकच उददेश….

निसर्ग निहाळतांना सहज पणे पाहिलेले पुरातन सांस्कृतिक स्थळे आणि स्मारके यांचे बरोबर भावनीक नाते निर्माण होवून आपल्या पुर्वजांनी निर्मीलेल्या त्या शौर्याचा, कलेचा, आणि प्रेमाचा अभिमान वाटतो. मग तो सहयाद्री असो वा हिमालय, हंपी असो वा राजस्थान, किंवा पुर्व ते पश्चिम वा उत्तर ते दक्षिण अनुभवतांना ‘भारत एक खोज’ या मालीकेच्या शीर्षक गिताच्या ओळी कानात गुंजतात आणि शुन्यात जावून मी तो कालखंड अनुभवतो.

पर्यावरणाच्या -हासाची कारणे शोधून आणि त्यावरील उपाय योजना म्हणून स्वत: आणि  माझ्या सारखे भटकंती वेडया मित्रंसामवेत प्रत्यक्ष आचरणात आणून, हा निसर्गाचा आणि आपल्या पुर्वजांच्या इतिहासचा अनमोल ठेवा जसाचतसा जतन करून आपल्याच वंशजाना  हस्तांतरीत करता यावा हाच या मागचा लोभ.

 

Western Ghats,trekking india

पिघले नीलम सा बहता हुआ ये समां
नीली नीली सी खामोशियाँ
न कहीं है ज़मीन, न कहीं आसमान
सरसराती हुई टहनियाँ, पत्तियां
कह रहीं हैं की बस एक तुम हो यहाँ..
सिर्फ मैं हूँ.. मेरी साँसें हैं.. मेरी धड़कने
ऐसी गहराइयाँ, ऐसी तन्हाइयां,
और मैं… सिर्फ मैं..
अपने होने पे मुझको यकीन आ गया …

 

– श्रीकांत शिंपी

_______________________

 

Join Me on FACEBOOK –

 

_______________________