17761114_1404664346277217_546642551717082415_o

.

वाटेतल्या आठवणी, आठवणीतील वाट, पुन्हा पुन्हा, पुन्हा …

.

नुकतच आटोपलं होतं जेवण

नाईट शुटचा तो निवांत क्षण

भव्य दैदिप्यमान ताऱ्यांचा तो सण

समोर होता अलंग विस्तीर्ण पण…

प्रतिबिंब त्या भंडारदऱ्याच्या पाण्यात साठवण

मनात भूतकाळातील अलग अलग आठवण

 

काही ठिकाणं स्वतःमध्ये अद्वितीय असतात पण कुठेतरी फोटोत पाहिल्यावर त्या मोहात माणूस पडतो आणि पुन्हा पुन्हा तेथे जावेसे वाटते. अलंग मदन कुलंग संबंधी कधीतरी असेच वाचण्यात आले असावे, नीट आता आठवत नाही. पण जसं चमत्कारी नाव तशी च रचना, अलंग मदन कुलंग ही त्रिकूट उच्चाराप्रमाणेच सर करण्यास अवघड…

अलंग मदन कुलंग म्हणजे महाराष्ट्राचा एवरेस्ट, प्रत्येक गल्लीबोळातील ट्रेकरचे स्वप्न की एकदातरी हा ट्रेक करावा, कारण अदभूत, चमत्कारी, अवघड, रहस्यमय आणि….

अलंग मदन कुलंग च्या पर्वत श्रुंखलेची निसर्गाने अतिशय निवांतपणे घडण केली असावी, कारण महाराष्ट्राच्या कणखर सहयाद्रीचा तो सौंदर्यपुर्ण नजराणाच आहे. एखादया शरीरसौष्ठव मल्लासारखे मजबूत, पिळदार व कणखर बांध्यामुळे तो स्थितप्रज्ञ वाटतो. या त्रिकूटाच्या जोडीला दुधात साखर म्हणजे कळसुबाईच्या उत्तुंग शिखराची अनादीकालापासूनची साथ. निसर्गाच्या या विस्तीर्ण चित्रपटलावर कुठेतरी नजर आणि मन एकत्र यावे असा हा मनमोहक व मनमौजी म्हणजेच अलंग मदन कुलंग.

अलंग मदन कुलंग ची सफर न्यारीच रात्री पुण्याहून प्रस्थान. सामान्य रस्त्याने न जाता आम्ही निवडलेली वाट ही भारीच, नागमोडी सुरुवात बोटयातून (Bota-Brahmanwada-Kotul-Rajur-Bhandardara) छोटी छोटी गाव, लहान लहान टेकडया जसे महाराष्ट्रातल्या बिना बर्फाच्या हिमाचलातील दऱ्या, कधी माणसं तर कधी बिबटया, तरस असे काहीसे अनभिज्ञ वाटसरु. साधारण महिन्या दोन महिन्यातून या वाटेवरची एखादी चक्कर ठरलेली, पण पावसाळयात मात्र आठवडा आठवडा पुन्हा पुन्हा फेऱ्या सुरुच, जसे प्रेयासीच्या घरावरुन दिवसातून दहा वेळा एरझाऱ्या नेहमीच्याच.

साधारणतः पाच ते सहा वर्षापुर्वी (2010 / 2011) ही ठिकाण अगदी दुर्लक्षित व नजरेपल्याड, पण गप्पांच्या ओघात असा प्लॅन ठरला की अलंग मदन कुलंग गाठावा, मग झाली जुळवाजूळव आधी मित्र जसे Dhawal Sharma व Sanjay Gunjkar आणि इतर… मग साहित्य तेही सायंकाळी रेल्वेने जनरल बोगीत अतीसामान्यांप्रमाणे मुंबई प्रवास मग तिथल्या काहिंना सोबत घेवून तिथूनच अलंग मदन कुलंगची वाट धरणे. ट्रेकींग सारख्या नवख्या विषयात माझे नुकतेच पदार्पण होते, पण नविनच असल्याने टाईट जिन्स त्यावर फॉर्मल शर्ट साधेच शुज असा काहिसा माझा अवतार होता. आवेशपूर्ण सुरुवात असूनही कुलुंगवाडी ते कुलंग किल्ला पायथ्यापर्यंत पोहोचता पोहोचता मी गलीतगात्र झालो. शिवाय आता पुढे चढणे अतिशय अश्यक्य हे मनाशी ठाम होत. पण मित्रांच्या आग्रहाने आणि धैर्याने जीवमुठीत धरुन कसा बसा ट्रेक पूर्ण केला. मात्र अलंग मदन कुलंग चा ट्रेक करून घरी गेल्यावर, पलंगावर पडल्यावर ‘अलंग मदन कुलंग आणि पलंग’ याची प्रचिती आठवडाभर येत होती. पण तरीही इतर ट्रेकच्या भाउ गर्दीत हा अलंग मदन कुलंग चा ट्रेक अगदी नामा निराळा…

सात आठ महिन्यांनी परत अलंग मदन कुलंग मोहीम त्यात बारा जणांचा चमू त्यातच Shridhar Purandare उर्फ लांबडा Lambda λ कारण अमिताभ सारखी उंची आणि मैत्रीची ही उंची म्हणूनच अतिशय जवळचा. आम्ही अलंग मदन कुलंग च्या खिंडीत चढण्यास सुरुवात करण्याची योजना आखत होतो, त्याच्या आतच, हा पटूठा केवळ 20 मिनिटांत कोणत्याही साधनाशिवाय अतिशय अवघड मदन टॉपला पोहोचून यशाचा शंखनाद करतो, जणू वामन अवतारात साडे तीन पावलात पृथ्वी पादाक्रांत करावी, अगदी तसेच आम्ही पाहातच राहिलो…

काही वर्षांच्यां विश्रांतीनंतर 2016 मध्ये अलंग मदन कुलंगची ओढ लागली. त्यात आमचे दोन lose points दिपक बालवडकर (Dipak Balwadkar) आणि आनंद पांडे (Anand Pande) त्यांना सोबत घेवून व त्यांनाच हिरो बनवून पुन्हा अलंग मदन कुलंग गाठला. अर्ध्यातच शुन्यात गेलेला आनंद दुःखाच्या भिंतीपल्याड पोहोचला, मनात असंख्य विचार आणि नजरेत खिन्नता आणि समोरच अलंग मदन कुलंग अर्धा चढलेला आणि अर्धा चढायच्या आतच…

चारदिवसाची शिदोरी पुरवून पुरवून पुरवाची असते. त्यातच आमचा आनंद चहाप्रेमी, पहिल्या चहातच संपुर्ण चहापत्ती टाकतो आणि आम्ही तीच पत्ती सुकवून पुन्हा पुन्हा चार दिवस चहा पुरवत पुरवत पितो.

चार दिवसांच्या दुष्काळी परिस्थितीतही जिन्नस पुरवायच्या असतानाच John (Johnson Tricclore) ची ती चवदार बिर्यानी आजही आठवते जसे भर वाळवंटात गोडया पाण्याचा तलाव सापडावा अगदी तसेच.

पहिल्याच दिवशी दिपक बालवडकरचे बल संपलेले, आतून भेदरलेला पण आमच्यात तसा तो कॉमेडियन म्हणूनच त्यामुळे चार दिव सांचा थकवा कधीच वाटला नाही.

2017 च्या अलंग मदन कुलंग ट्रेकची आठवण आजही आहे. आमचा स्वानंद (Swanand Kulkarni) तसा सोज्वळ, घरेलू, आम्ही त्याला घरातुन उचलला आणि तो थेट अलंग मदन कुलंग वर नेवून ठेवला. स्वानंदचा आनंदच भारी. अतिशय जोशात भारी भरकम सामानासह त्या तो ट्रेक त्याने पूर्ण केला.

आमचे दोन धैर्यशील डोंगर मित्र प्रविण (Pravin Murkute) व सुबोध (Subodh Atitkar) यांनी रोपक्लाईबींगच्या साहित्यासह सर्वाना आधार देत, सर्वांची काळजी करत ट्रेक चा भार उचलला पण कधीही त्याचा जाणीव आम्हाला होवू दिली नाही, हा त्यांचा मोठेपणा.

अलंग मदन कुलंग च्या या ट्रेकचे अजून एक वेगळे पण म्हणजे आमच्या सर्व मित्रांत या वेळी एक गिरीप्रेमी मैत्रीण ही सामील झाली, ती म्हणजे अनुराधा गोखले (Anuradha Gokhale) तशी ती साधीच पण तिला ट्रेक ची भलतीच आवड. भरउन्हात स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर खडतर असा हा अलंग मदन कुलंग चा ट्रक तिने पुर्ण केला. पण महत्वाची बाब म्हणजे, 2016 च्या AMK Trek ला John (Johnson Tricclore) नसला तरी आम्हा परत एक John मिळाला, कारण या वेळी बिर्यानी करायला John नव्हता पण अनुराधाची स्वादिष्ट खिचडी आपुलकीची…

अलंग मदन कुलंग trek चे वैशिष्ट म्हणजे आमचा गाईड म्हणून जी व्यक्ती होती ती म्हणजे ‘कमळू’ नावाप्रमाणेच सडसडीत देहयष्टी, कधी चिडचिड नाही, चेहऱ्यावर ताण नाही. समोर आल्यावर वाटणारही नाही हा कधी डोंगर चढणार आणि आपल्याला काय गाईड करणार पण अतिशय काटक व सर्वाची काळजी घेवून नेणारा…

अशा अलग अलग आठवणींचा अलंग मदन कुलंग नेहमीच नवखा, हवाहवासा जसा त्याची आणि आमची भेट जरी कालपरवाची पण ऋणानुबंध पुर्वजन्माचे…

.

 

_______________________

 

Join Me on FACEBOOK –

 

_______________________